गोंडवाना विद्यापीठास आदिवासी व वन विद्यापीठाचा दर्जा द्या: आ.सुधीर मुनगंटीवार*

*गोंडवाना विद्यापीठास आदिवासी व वन विद्यापीठाचा दर्जा द्या: आ.सुधीर मुनगंटीवार

*शासकीय विधेयक आणण्याची मागणी*
*मंत्री उदय सावंत यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद*

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल आणि विपुल वनसंपदा लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ातील गोंडवाना विद्यापीठास आदिवासी आणि वन विद्यापीठाचा दर्जा प्राप्त व्हावा व यासाठी येणाऱ्या विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात शासकीय विधेयक आणावे अशी मागणी राज्याचे उच्च व तंन्त्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे श्री सावंत यांच्याशी आ. मुनगंटीवार यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली व त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

गडचिरोली या आदिवासी व दुर्गम क्षेत्रातील युवक-युवतींच्या भविष्याकरिता आशेचा किरण असलेला हा विद्यापीठ परिसर सर्वांग सुंदर व्हावा आणि येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाचा लाभ या विद्यापीठामुळे होणार असून ट्रायबल एण्ड फॉरेस्ट युनिव्हर्सिटी चा दर्जा मिळाल्यास केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देता येईल. यामुळे संपूर्ण क्षेत्रातील विकासाला चालना मिळेल असेही आ.सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

गोडवाना विद्यापीठाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध व्हावा आ. मुनगंटीवार यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. आवश्यक निधीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देत विद्यापीठ प्रशासन तसेच वन विभागानेही या विषयाकडे लक्ष द्यावे अशा सूचना विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यापीठाला आदिवासी आणि वन विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी सर्वांकश प्रयत्न सुरू आहेत. मौजे अडपल्ली येथील जमीन भूसंपादननाकरिता आवश्यक ते सर्व प्रयत्नही सुरू आहेत. सुमारे दोनशे एकर जमीन ताब्यात घेऊन परिसर भव्य व सर्वांत सुंदर व्हावा यादृष्टीने शासकीय स्तरावर कुठेही कुचराई होता कामा नये. महाराष्ट्र विधिमंडळाच्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याद्वारे विद्यापीठासाठी 34 कोटी 50 लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here