Home Breaking News जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभागाच्या प्रारूप रचनेचा कार्यक्रम जाहीर
*
चंद्रपूर, दि. 2 जून : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रभागाच्या रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. या अनुषंगाने 2 जून 2022 रोजी जिल्हा परिषद चंद्रपूर व त्या अंतर्गत असणाऱ्या 15 पंचायत समिती प्रारुप प्रभाग रचना या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व जिल्हा परिषद कार्यालयातील नोटीस बोर्डावर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय पंचायत समिती येथील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उपरोक्त प्रभाग रचनेबाबत ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे 8 जून किंवा त्यापूर्वी सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेण्यात येणार नाही, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक यांनी कळविले आहे
00000
Don`t copy text!