.ता- चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा पडल्याने गंभीर रुग्णांना रक्ताचा पुरवठा करणे कठीण झाले आहे. या उद्भावलेल्या परीस्थितीत सामाजिक दायीत्व म्हणून मुल येथील उपजिल्हा रुग्णालय आणि विविध सामाजिक संस्था यांच्या सयूंक्त विधमाने ता.4 जुन 2022 ला सकाळी 10 वाजता पासुन दुपारी 2 वाजे पर्यंत रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित असुन शहरातील नागरीकांनी सहकार्य करून जास्तीत जास्त रक्त संकलन करण्यास मदत करावी. असे आवाहन शिबिर संयोजकांनी केले आहे.
नाव नोंदणी करीता पुढील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करता येईल.9322293265