बसचा धडकेने महीलेचा मृत्यू , मूल बसस्थानकातील घटना

0
410

मूल बसस्थानकावरील अलीकडच्या काळातील तिसरी घटना

मूल.ता- बस स्थानकावरून प्रवासी भरून चंद्रपूर कडे जायला निघालेल्या बसला एक महीला अचानकपणे धडकली. धडकेमुळे गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या महीलेचे नाव सरिता मनोज कर्रेवार वय २६ वर्षे राह. मारोडा असे आहे.
सरीता पती मनोज व मुलांसोबत गडचिरोलीला जायला मूल बसस्थानकात आली होती. एमएच ४० ८९५१ क्रमांकाची गडचिरोली आगाराची बस मूल येथील बसस्थानकावरून प्रवासी भरून चंद्रपूर कडे जायला निघाली असतांना सरिता अचानकपणे बसला धडकली. धडकेने खाली पडल्याने तिचा डोक्याला गंभीर जखम झाली. बस चालकाने तातडीने सदर महीलेला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु उपचार सुरू असतानांच महीलेचा मृत्यू झाला.

बसचा धडकेने प्रवाश्यांच्या मृत्यू होण्याची अलीकडच्या काळातील ही सलग तिसरी घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here