गेडाम ले-आऊट मधील जागेच्या वादातुन घडली घटन
मूल.ता- राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूल शहर महिला अध्यक्षा अर्चना मार्क॔डी चावरे यांचे शेजारी राहणारे सत्यविजय वाळके, सुवर्णा सत्यविजय वाळके आणि मुलगा आतिष सत्यविजय वाळके या तिघांनी मिळुन चावरे यांना अश्लील शब्दांत शिवीगाळ करून त्यांचे अंगावर धाऊन जाऊन अंगाला हात लावून विनयभंग केले. बचावासाठी आलेल्या मुलगा राहुल मार्क॔डी चावरे याला तिघाही आरोपींनी मारहाण केल्याची तक्रार मूल पोलीस ठाण्यात करण्यात आली. चावरे यांच्या तक्रारीवरून मूल पोलीसांनी भादवी कलम 354,324,509,506,504,व 34 अन्वये वाळके कुटुंबीयां विरूथ्द गुन्हा नोंद करून पिता-पुत्रा अटक केली. सदर घटना काल ता. 6 ला रात्री 10 वाजता दरम्यान घडली. तक्रारीतील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. मूल न्यायालयाने तिघाही आरोपींना जामिन मंजूर केला.