नवी दिल्ली, ७ जून. भारतीय जनसंचार संस्थान देशातील सर्वात प्रतिष्ठित माध्यम शिक्षण संस्था आहे. सदर संस्थे अंतर्गत चालविल्या जाणा-या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) मध्ये पाच PG डिप्लोमा कोर्सेस च्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र 2022-23 साठी आयोजित या प्रक्रियेत, अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 18 जून 2022 आहे. प्रवेश परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतली जाईल. ऑनलाइन अर्ज NTA च्या अधिकृत वेबसाइट www.cuet.nta.nic.in वर उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांना यावर्षी आयआयएमसीमध्ये कॉमन युनिव्हर्सिटीज एन्ट्रन्स टेस्ट (CUET PG) 2022 द्वारे प्रवेश मिळेल. इंग्रजी पत्रकारिता, हिंदी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि टेलिव्हिजन पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये पीजी डिप्लोमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ‘CUET PG’ परीक्षा द्यावी लागेल. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल. ओडिया, मराठी, मल्याळम आणि उर्दू पत्रकारितेतील डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी आयआयएमसीद्वारे स्वतंत्र परीक्षा घेतली जाईल, ज्यासाठीचे अर्ज लवकरच IIMC च्या अधिकृत वेबसाइट www.iimc.gov.in वर प्रसिद्ध केले जातील.
आयआयएमसीचे डीन (शैक्षणिक) आणि प्रवेश प्रभारी *प्रा. गोविंद सिंग* यांनी माहिती दिली की ज्या विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केली आहे ते आयआयएमसीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. जे विद्यार्थी त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टर परीक्षेत बसले आहेत किंवा बसणार आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. निवड झाल्यावर, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या तात्पुरत्या गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्राची मूळ प्रत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करावी लागेल. जर या विद्यार्थ्यांनी आयआयएमसीच्या कार्यालयात पडताळणीसाठी मूळ पदवी प्रमाणपत्र सादर केले तरच त्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा दिला जाईल.
प्रो. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही समस्या असल्यास, विद्यार्थी शैक्षणिक विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अरुणा असफ अली मार्ग, नवी दिल्ली-110067 येथे संपर्क साधू शकतात. याशिवाय तुम्ही दूरध्वनी क्रमांक 011-26742920, 26742940, 26742960 (विस्तार 233) वर देखील संपर्क साधू शकता. अर्जदार 9818005590 या मोबाईल क्रमांकावरूनही माहिती मिळवू शकतात. विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे माहिती मिळवायची असल्यास 9871182276 या मोबाईल क्रमांकावर मेसेज करू शकतात.