राष्ट्रवादीच्या मूल शहर महीला अध्यक्षांचे विनयभंग ,आरोपीनां अटक व जामिन

0
692

मूल. ता- राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूल शहर महिला अध्यक्षा अर्चना मार्केडी चावरे यांचे शेजारी राहणारे सत्यविजय वाळके, पत्नी आणि मुलगा आतिष सत्यविजय वाळके या तिघांनी मिळुन चावरे यांना अश्लील शब्दांत शिवीगाळ करून त्यांचे अंगावर धाऊन जाऊन अंगाला हात लावून विनयभंग केले. बचावासाठी आलेल्या मुलगा राहुल मार्केडी चावरे याला तिघाही आरोपींनी मारहाण केल्याची तक्रार मूल पोलीस ठाण्यात करण्यात आली. चावरे यांच्या तक्रारीवरून मूल पोलीसांनी भादवी कलम 354,324,509,506,504 व 34 अन्वये वाळके कुटुंबीया विरूद्ध गुन्हा नोंद करून अटक केली. सदर घटना काल ता. 6 ला रात्री 10 वाजता दरम्यान घडली. तक्रारीतील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. मूल न्यायालयाने आरोपींना जामिन मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here