अवैध वाळु वाहतुक प्रकरणी मूल तहसीलदाराची मोठी कारवाई

0
46
  • मूल.ता- अवैध वाळु वाहतुक प्रकरणी मूल तहसीलदारानी दोन हायवा ट्रक जप्त करून विना परवानगी वाळु वाहतुक करीत असल्या कारणावरून मोठी दंडात्मक कारवाई केली.

         अवैध वाळु वाहतुक नियमाअंतर्गत शासनाने निर्धारीत केलेल्या दंडाची रक्कम आकारण्यात आली. तहसील कार्यालयाची सबधित कर्मचा-यांकडुन मिहालेल्या माहिती नुसार हायवा ट्रक क्रमांक एमएच 34 बीजी 5097 आणि एमएच 34 बीजी 6981 हे पोंभुर्णा कडुन मूल तालुक्यातील केळझर मार्गे मूलकडे येत असतांना तहसीलदार यांच्या गौण खनीज दक्षता पथकाने केळझर येथे सदर हायवा ट्रक पकडले. अधिक माहिती घेतली असता दोन्ही ट्रक चालकांकडे वाळु वाहतुकीची परवानगी नव्हती. त्यामुळे अवैध वाहतुक अंतर्गत दोन्ही ट्रकांवर जप्तीची कारवाई करून ते मूल येथे आणण्यात आले. संबधित ट्रक मालकाला नोटीस तामील करून म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. ट्रक मालकाने विना परवानगी वाळु वाहतुक केल्याचे मान्य केल्याने तहसीलदार यांनी दोन्ही ट्रकांवर प्रत्येकी दोन लाख बासष्ट हजार चारशे रूपये याप्रमाणे पाच लाख चैविस हजार आठशे रूपये एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

वाळुघाट बंद झाले तरी चोरी सुरूच

शासन नियमानुसार 10 जुननंतर वाळुघाटातुन वाळु उपसा करणे बंद करण्यात आले असतांना वाळु उपसा सुरूच असल्याचे सदर प्रकरणावरून स्पष्ट होते. वाळु चोरी करणारे एवढे निडर झाले आहे की, त्यांना शासनाचे कायदे नियमही अडवु शकत नाही. यातुन शासन-प्रशासनाची कमतरताच दिसुन येते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here