10 प्रभागातुन 20 सदस्यांची होणार निवड,सुचना व हरकतींसाठी 21 जुन अंतीम तारीख
मूल.ता-आगामी मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर,प्रभारी मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांच्या प्रमुुख उपस्थितीत पार पडलेल्या या आरक्षण सोडतीमध्ये नगर परिषद मूलच्या परीसिमांकन केलेल्या १० प्रभागामधुन २० प्रतिनिधी निवडुण दयावयाचे आहे.
आगामी निवडणुकुसाठी निश्चित केलेल्या सदस्यसंख्येतुन ५० टक्केप्रमाणे आधी महीलासांठी १० जागा आरक्षीत करण्यात आले. यानंतर अनुसुचीत जाती आणि अनुसचीत जमातींचे आरक्षण काढण्यात आले. अनुसुचीत जातीच्या तीन जागांपैकी दोन जागा महीलांसाठी आरक्षीत आहे. अनुसुचीत जमातीच्या दोन पैकी एका जागेवर महीलेला निवडुन दयावयाचे आहे. उर्वरीत पंधरा जागांपैकी सात जागी महीला सदस्य राहणार आहे. २० पैकी १० जागा महीलांसाठी आरक्षीत असतांना इतर जागेतुनही महीलांनी निवडणुक लढविल्यास पालीकेत महीलांचेच बहुमत होईल अशी परीस्थिती आहे.
मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पाडलेल्या प्रभागरचनेत एका प्रभागातुन दोन सदस्य निवडुन दयायचे आहे. प्रत्येक प्रभागात अ आणि ब अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक एक मध्ये 1अ ही अनुसुचीत जमातीचा महीलेसाठी आरक्षीत ठेवण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक आठ व नऊ मध्ये अनुक्रमे ८अ आणि ९अ मध्ये अनुसुचीत जातीचा महीला उमेदवार असतील. प्रभाग क्रमांक सात मधील ७अ ही जागा अनुसुचीत जमातीसाठी तर प्रभाग क्रमांक दहा मधील १०अ या जागेवर अनुसुचीत जातीतील सदस्यांमध्ये लढत होणार. पालीकेच्या प्रत्येक प्रभागात महीला उमेदवार राहणार असल्याने महीला-पुरुष अशी जोडीच मतदारांच्या दारात दिसुन येणार आहे.
प्रभाग आरक्षण सोडतीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असुन सर्वच राजकीय पक्षांचे नेते संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा घडवुन आणण्यास सुरू केले आहे. आरक्षण सोडतीबाबत कुणाला सुचना वा हरकती दाखल करावयाचे असल्यास त्यासाठी २१ जुन २०२२ पर्यंत संधी देण्यात आली असुन हरकती वा सुचना जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे दाखल करावयाचे आहे.