मूल.ता.- येथील नगरपरिषद शाळेच्या नविन इमारतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्राथमिक संघ शिक्षा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर-गडचिरोली या दोन जिल्ह्यातील १८ ते ५८ वयोगटातील ३७ जणांना संघाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. १० जूनपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण शिबिराचे व्यवस्थापन मूल मधील संघपरिवार करीत आहे. शिबिरादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्थापना उद्देश आणि संघाचे प्रत्यक्ष कार्य याविषयी माहिती करुन देण्याचे उद्देशाने शहरातील वैद्यकीयतज्ज्ञ,अधिवक्ता,व्यवसायीक अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना संघ शिक्षा प्रशिक्षण शिबिरात पाचारण करण्यात आले. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी स्वरूपाचे असुन १७ जुन ला समारोप होणार असल्याची माहिती शिबिर मुख्यव्यवस्थापक सुखदेव मांदाडे यांनी दिली.