भाजपाने घेतली आघाडी,ईच्छुकांकडुन उमेदवारी अर्ज मागविले

0
141

नगर परिषद निवडणुक

 

मूल.ता.- मूल शहर भारतीय जनता पार्टीने नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली असुन निवडणुकीत भाग्य आजमाविण्याची ईच्छा असणा-यांकडून उमेदवारीसाठी अर्ज मागविले आहे.
मूल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. निवडणुकीच्या कार्यक्रम अद्याप द्ष्टीक्षेपात आलेला नसतांनाही भाजपाने घेतलेली आघाडी आपण किती वेगवान आहोत हे दर्शवित आहे. भाजपाकडुन उमेदवारी मिळविण्यासाठी ईच्छुक असणा-यांनी ३० जुन पर्य॔त अर्ज सादर करावे असे आवाहन शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, सरचिटणीस चंद्रकांत आष्टनकर,अजय गोगुलवार यांनी केले आहे. आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here