वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाखांची आर्थिक मदत

0
145

मुल.ता.– मूल तालुक्यातील बफरझोन क्षेत्रा लगत असलेल्या गावातील जंगलात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या दोन इसमांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी पंधरा लाखांचे आर्थिक मदत देण्यात आली.
मूल तालुक्यातील मारोडा येथील गजानन गुरनुले हे ३० एप्रिल ला तर भादुर्णी येथील कुषाल सोनुले १५ मे ला वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत मुल वनपरिक्षेत्र चे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर यांच्या विशेष प्रयत्नातून तातडीने देण्यात आली. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पंधरा लाख रुपयाचे धनादेश आज ता २२ ग्रामपंचायत मारोडा चे सरपंच भिकारुजी शेंडे, मारोडाचे क्षेत्र सहाय्यक पाकेवार वनरक्षक वडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here