मूल शहराच्या सौदर्याला गालबोट लावणा-या मालधक्क्या विरोध झाला तिव्र
मूल.ता- गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील खनीज पदार्थ वाहुन नेण्यासाठी मूल येथील रेल्वेस्थानका शेजारी खनीज पदार्थ डंपींग यार्ड (मालधक्का) बनविल्या जात आहे. या डंपींग यार्डमूळे मोठया प्रमाणात वायुप्रदुषण होऊुन नागरीकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे. डंपींग यार्ड मधुन मानवी शरीराला घातक असे खनीज पदार्थांची वाहतुक होणार असल्याने डंपींगयार्ड मूल मध्ये नको अशी येथील नागरीकांची मागणी आहे. यासाठी आता नागरीकांनी आंदोलनाची तयारी चालविली असुन उद्या ता.27 ला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या आरोग्याबाबत सजग असलेल्या शहरातील नागरीकांनी मूल रेल्वे स्थानका शेजारी होऊ घातलेल्या खनीज पदार्थ डंपीगंयार्ड (मालधक्का) च्या दुष्परीणामाबाबत सर्वत्र माहिती प्रसारित करून मालधक्का विरोधात चांगले वातावरण निर्माण केले आहे. मंगळवारच्या मोर्चा भव्य दिव्य ठरण्यासाठी प्रस्तावित मालधक्क्याविरोधात नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आली.
ReplyForward
|