मूल शहरात मालधक्का नकोच ! खनीज डंपीगयार्डला नागरीकांचा तिव्र विरोध

0
59

शहराच्या सौदर्याला गालबोट लावु नका, प्रसंगी आंदोलनात्मक मार्गाच्या अवलंब करू

मूल.ता- गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील खनीज पदार्थ वाहुन नेण्यासाठी मूल येथील रेल्वेस्थानका शेजारी खनीज पदार्थ डंपींग यार्ड (मालधक्का) बनविल्या जात आहे. या डंपींग यार्डमूळे मोठया प्रमाणात वायुप्रदुषण होऊुन नागरीकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे. डंपींग यार्ड मधुन मानवी शरीराला घातक असे खनीज पदार्थांची वाहतुक होणार असल्याने डंपींगयार्ड मूल मध्ये नको अशी येथील नागरींकांची मागणी आहे. यासाठी प्रसंगी आंदोलनाची तयारी असल्याचे पत्रकार परीषदेत स्पष्ट करण्यात आले.
आपल्या आरोग्याबाबत सजग असलेल्या शहरातील माॅंर्निंग गृपच्या वतीने आयोजीत पत्रकार परिषदेत मूल रेल्वे स्थानका शेजारी होऊ घातलेल्या खनीज पदार्थ डंपीगंयार्ड (मालधक्का) च्या दुष्पणामाबाबत माहिती देण्यात आली. येथील तांदुळ व्यवसायीक जीवन कोंतमवार यांनी सांगीतले की, गडचिरोली जिल्हयातील सुरजागड प्रकल्पातुन निघणारे गंधक,फास्फरस,मॅग्नीज यासारखे मानवी शरीराला घातक असलेल्या खनीज पदार्थांच्या वाहतुकीसाठी मूल येथील रेल्वे स्थानका शेजारी डंपींग यार्ड बनविला जात आहे. सुरजागड इथुन निघणारे खनीज मोठया ट्रकांव्दारे मूल येथील डंपींग यार्डमध्ये आणुन खाली केले जातील आणि रेल्वे डब्बे किंवा वॅगीनमध्ये भरून मागणी असलेल्या भागांमध्ये पोहचविल्या जातील. या उदयोगाच्या मूल शहरातील अथवा तालुक्यातील कोणत्याही नागरीकांच्या काडीमात्राचा लाभ होणार नाही आहे. याउलट खनीज पदार्थांच्या डंपींगयार्ड मूळे शहराच्या प्रदुषणात मोठयाप्रमाणात वाढ होऊन नागरींकाच्या आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे. डंपींगयार्डमुळे खनीज पदार्थांचे बारीककण धुळीच्या रूपाने हवेत मिसळुन ते श्वसनाव्दारे माणसे,प्राण्यांच्या शरीरात जाऊन आरोग्याची हानी करणार आहे. मूल शहर जंगलव्याप्त असुन डंपींगयार्ड बनविण्यात येत असलेल्या परिसरात वन्यप्राण्याचे वास्तव्य असते. डंपींग यार्डमधील खनीज पदार्थांच्या सर्वाधिक त्रास त्यांना होणार आहे. तसेच शहरातील नागरींकांना मोकळा श्वास घेण्यासाठी रेल्वे शेजारी असलेला परिसर खुप उपयुक्त आहे. इथे शहरातील शेकडो नागरीक दररोज सकाळ सायंकाळ शारीरिक कसरत करण्यासाठी,फिरण्यासाठी येत असतात. खनीज पदार्थांच्या वाहतुकीसाठी इथे डंपींगयार्ड बनविल्यास नागरींकांना त्याच्या त्रास होणार आहे. सोबतच सुरजागडहुन खनीज पदार्थ वाहुन आणणारे ट्रक शहरातुन जाणे-येणे करीत असल्याने शहरातील वाहतुक व्यवस्था कोलमडेल. प्रदूषण करणारे वाहन वाढल्याने प्रदुषणात वाढ होऊन अपघातांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे येथील रेल्वेस्थाका शेजारी होणारे डंपींगयार्डचे (मालधक्का) काम त्वरीत बंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन आमदार सुधीर मुनगंटीवार, तहसिलदार,रेल्वेचे नागपूर विभाग मुख्य व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे. संबधितांनी निवेदनाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी अषी अपेक्षा व्यक्त करण्यात आली अन्यथा आंदोलनात्मक मार्गाच्याही अवलंब करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. पत्रकार परिशदेला संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, पंचायत समितीचे माजी सभापती चंदु मारगोनवार, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदु रणदीवे, माजी नगर सेवक प्रशांत समर्थ, व्यवसायीक हीरेन गोगरी,दिनेश गोयल,संजय येरोजवार,विजय केशवानी,संतोष पालांदुरकर,अमोल बच्चुवार, श्रिकांत बुक्कावार,नरेश बोमनवार,सचिन चिंतावार,रूपेश मारकवार, श्रमिक एल्गारचे विजय सिध्दावार, अधिवक्ता अश्विन पाॅलीवाल, गौरव शामकुळे आणि मोठयाप्रमाणात नागरीक उपस्थीत होते.

लाॅयड मेटलस् कंपनी विरोधात गुन्हा दाखल– डंपींगयार्ड करीता रेल्वे फाटकाला लागुन रस्त्याचेकाम करण्यात येत आहे. या भागात मोठमोठी सागवान आणि इतरही प्रजातीचे वृक्ष आहेत. डंपींग यार्डआणि रस्त्याचे काम करणा-या लाॅयड मेटलस् कंपनीने वनविभागाची पुर्व परवानगी न घेता या भागातील झाडांची मोठया प्रमाणात कत्तल केली. सदर प्रकाराची तक्रार करण्यात आल्याने वनविभागाने संबधितकंपनी विरोधात वन कायदया अंतर्गत गुन्हा नोंद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here