रेल्वे मालधक्क्या विरुद्ध मुल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे भव्य जनआंदोलन

0
65

मूल.ता- मूल येथे होत असलेल्या रेल्वे माल धक्क्या विरुद्ध तथा केंद्र सरकारविरुद्ध गांधी चौक मूल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ ह्यांचे नेतृत्वात ठीय्या आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई ह्यांनी केंद्र सरकारच्या आशीर्वादाने रेल्वे मालधक्का होत असल्याने केंद्र सरकारला जनतेच्या जीवनाची काहीच किंमत नसल्याची टीका केली.
माल धक्का विरुद्ध मूल मधील नागरीकांच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ह्यांच्यापर्यंत नक्की पोहचविले जाणार असुन मूल शहराला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन शेख यांनी दिले.
जनतेच्या समस्या सोपविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हातखंडा असुन मूल मधील नागरीकांना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच न्याय मिळवून देऊ शकते असा विश्वास सुमीत समर्थ ह्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर ह्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. तसेच सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रेल्वे मालधक्याच्या विरोधात निदर्शने करीत गांधी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत पदयात्रा काढली. ढोल – ताशा चा गजऱ्यात पदयात्रा व निदर्शने करीत तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
मूल मधील जनतेच्या सततच्या आंदोलनाचा आदर करून सरकारने मालधक्क्याच्या निर्णय रद्द करावा अन्यथा यानंतरचे आंदोलन तीव्र स्वरूपात होतील आणि त्यामूळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार सरकारच असेल असा इशारा देण्यात आला.
आंदोलन यशस्वी होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस चे मूल तालुकाध्यक्ष किसन वासाडे , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे , तालुका महिला अध्यक्ष नीता गेडाम , शहर महिला अध्यक्ष सौ अर्चना चावरे, युवक तालुकाध्यक्ष समीर अल्लूरवार , शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, युवा नेते बंडू साकलवार , अनिकेत मारकवार , शहर उपाध्यक्ष दुष्यांत महाडोळे तालुका सचिव ज्ञानेश्वर वाघमारे ,करन शेंडे, अजय त्रिपत्तीवार , नंदू बारस्कर प्रभाकर धोटे , हेमंत सुपणार , रंगनाथ पेडुकर , लाला साळवे , संदेश भोयर ,अशोक मारगणवार , मंगल मशाखेत्री , इंद्रापाल पुणेकर रोहिदास वाढई, शुभम शेंडे, सतीश गुरनुले , संदीप तेलंग ,बालाजी लेनगुरे ,राहुल तोटावार , संध्या निकुरे , जयश्री झरकर , मारोती रोहिने , गणेश गायकवाड आदी बहुसंख्य पदाधिकारी हजारो च्या संख्येने जणआंदोलन स्वइच्छेने रॅलीत सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here