मूल.ता- शेतामध्ये कचरा काढत असतानां साप चावल्याने एका शेतमजुर महीलेचा मृत्यू झाला. मृतक येथील वार्ड क्रमांक 5 मधील रहिवासी असुन महीलेचे नाव माया दिलीप चिताडे वय 52 आहे. सदर घटना काल दुपारी 2 वाजता दरम्यान घडली.
येथील मनोज कावळे यांच्या शेतात निंदा (कचरा) काढण्याचे काम सुरू आहे. माया सोबत आणखी ब-याच महीला निंदा काढण्याच्या कामात होत्या. साप चावल्याचे लक्षात आल्यानंतर सहकारी महीलांनी शेत मालकाला माहीत दिली. शेतमालकाने तातडीने येथील उपजिल्हा रूग्णलयात माया चिताडे हीला भरती केले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यावेळी सर्प मित्र उमेशसिंह झिरे, प्रशांत केदार उपस्थीत होते.