उद्या 2 आक्टोंबर ला मालधक्का विरोधात मूक शांती आंदोलन

0
66

मूल बचाव संघर्ष समितीच्या पुढाकार

मुल.ता- येथील प्रस्तावित मालधक्क्या विरोधात मूल बचाव संघर्ष समितीच्या वतीने मूक शांती आंदोलन करण्यात येत आहे.
2 ऑक्टोंबर ला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती सर्व जगभर साजरी केली जाते. या दोन महान विभूतींच्या जयंतीचे औचित्य साधून उद्या सकाळी 10 ते 12 वाजता पर्यंत मूक शांती आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील गांधी चौकात होणाऱ्या मूक शांती आंदोलनात मूल बचाव संघर्ष समितीच्या बॅनरखाली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहे. मूल शहरातील नागरिकांवर आलेल्या मालधक्क्याचे संकट परतून लावण्यासाठी अनेक हात आता एकवटले असून सर्वच सर्व स्तरावर प्रयत्न होत आहे. मालधक्का आणि त्याच्याशी संबंधित जड वाहनांची वाहतूक शहरातील नागरिकांचे आयुष्य कमी करणारे आहे. यामुळे मूल शहराकडे पाहण्याच्या दृष्टिकोनच बदलून जाणार आहे. मागील कित्येक वर्षापासून मूल शहराला शांत आणि प्रगतिशील म्हणून ओळखले जाते. इथे येऊन काही वर्ष वास्तव्य करणाऱे आणि नंतर इथेच स्थायिक झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु प्रस्तावित मालधक्क्यामुळे शहराची ही ओळख पुसण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र मूल शहरातील सजग नागरिकांनी ही समस्या कायमची सोडवण्याच्या विडा उचलला असुन विधायक मार्गाने विवीध आंदोलने करून मालधक्का हटविण्यास शासनाला भाग पाडू असा विश्वास निर्माण झाला आहे. याच विश्वासाने उद्या दोन ऑक्टोबरला आयोजीत मूक शांती आंदोलनात शहरातील नागरिकांनी प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मूल बचाव संघर्ष समिती केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here