बुद्धगिरी बहुउद्देशीय सेवा संस्थाच अधिकृत : सचिव विजया रामटेके

0
76

4 नोव्हेंबर ला साजरा होणार बुध्दगिरीचे 19 वा वर्धापन दिन

मुल.ता- येथील बौद्धगिरी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या कार्यकारणी बदलाचा प्रस्ताव सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी स्वीकारला असून ही संस्थाच अधिकृत असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.
या संबंधाने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना संस्थेच्या सचिव विजया रामटेके यांनी सांगितले की, संस्थेने सादर केलेल्या कार्यकारिणी बदल प्रस्तावा संबधाने सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणी दरम्यान अधिकृत संस्थेच्या विरोधात आक्षेप आणि नविन संस्थेसाठी अर्ज टाकणाऱ्यांपैकी कोणीही सदर सुनावणीस हजर झाले नाही. मधले दोन वर्ष कोरोनामुळे सदरचे प्रकरण सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात संस्थेबाबत निर्णय प्रलंबित होता. 4 फेब्रुवारी 2022 ला सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी सदर संस्थेने सादर केलेला कार्यकारणी बदल प्रस्ताव मंजूर करून आक्षेप कर्त्याचे आक्षेप आणि नवीन संस्थेच्या अर्ज नामंजूर केला. सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या सदर आदेशाने बुद्धगिरी बहुउद्देशीय सेवा संस्था हीच अधिकृत असल्याच्या निर्वाळा झाला असून आता समाजाने कोणतेही गैरसमज मनात आणू नये असे आवाहन संस्थेचे नवीन अध्यक्ष धम्मशील मेश्राम यांनी केले आहे. येत्या 5 ऑक्टोबरला संस्थेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि 4 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बुद्धगिरीचे 19 व्या वर्धापन दिनाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र यावे असे आवाहन संस्थेच्या सचिव विजया रामटेके आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी कोषाध्यक्ष वनमाला रामटेके, सदस्य सुमन खोब्रागडे, वीरेंद्र मेश्राम, गुलाब मोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here